-6.6 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

कणकवलीत वैभव नाईक यांचा शहर विकास आघाडीच्या प्रचारात सहभाग

कणकवली : ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये शहर विकास आघाडीच्या प्रचार फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर आणि प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या समर्थनार्थ त्यांनी डोर टू डोअर प्रचार केला.

या प्रचार फेरीत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह शहर विकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधताना माजी आमदार वैभव नाईक यांनी “कणकवली नगरपंचायतीतील भ्रष्टाचार संपवायचा असेल तर शहर विकास आघाडीला मतदान करा” असे आवाहन केले.

प्रचार फेरीदरम्यान सुशांत नाईक यांच्यासोबत राजू शेट्ये, संतोष परब, विलास जाधव, रणजित धुमाळे, किरण वर्दम, समीर सावंत, सुधाकर काजरेकर, संदेश जाधव, साई मोर्ये, संतोष सावंत, निलेश जाधव, प्रतीक रासम, कमलेश नारकर, संकेत कुडतरकर, दया परब, प्रतीक्षा साटम, मीनल म्हसकर, नंदिनी धुमाळे, शैलजा धुमाळे, वनीता सामंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!