कणकवली : कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५मध्ये शुक्रवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पारकर व नगरसेवक पदाच्या १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी ३ तर १७नगसेवकपदासाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग ९ व प्रभाग ३ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर १५ प्रभागांमध्ये दुरंगी लढत भाजपा व शहर विकास आघाडीमध्ये होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपाचे समीर नलावडे, शहरविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात थेट लढत होईल.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेणाऱ्यांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सौरभ पारकर, नगरसेवक पदाचे माघार घेतलेले उमेदवार प्रभाग १ राजेश राणे, प्रभाग २ रोहिणी पिळणकर, प्रभाग ३ शिवम राणे, प्रभाग ४ श्रेया पारकर, प्रभाग ७ सोनाली कसालकर, प्रभाग ८ किशोर कांबळे, विठ्ठल कासले, प्रभाग १२ साक्षी नेरकर, प्रभाग १५ सुप्रिया नाईक, प्राजक्त आळवे, प्रभाग १६ हिरेन कामतेकर, सोहम वाळके, प्रभाग १७ मयुरी नाईक आदी उमेदवारांचा सामावेश आहे.
त्यामुळे १७ नगरसेवक पदाच्या जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत ३ उमेदवार रिंगणात आहेत.