-7.7 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

प्रभाग ८ मधील अपक्ष उमेदवार राजू कासले यांनी उमेदवारी मागे घेत शहर विकास आघाडीला दिला जाहीर पाठिंबा

कणकवली – नगरपंचायत निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक ८ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले श्री. विठ्ठल (राजू) शंकर कासले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या मागे घेत असल्याची घोषणा केली.

मतांची विभागणी होऊन इतर उमेदवारांना त्याचा लाभ होण्याची शक्यता विचारात घेऊन तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. संदेश पारकर यांच्याशी असलेले स्नेहपूर्ण संबंध, समाजाशी त्यांचा कायमचा जिव्हाळा आणि विश्वास या कारणांमुळे त्यांनी शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

माननीय आमदार निलेशजी राणे यांच्या कार्यशैलीतून मिळालेली प्रेरणा आणि माजी आमदार राजन तेली यांचे मार्गदर्शन यांचाही या निर्णयावर प्रभाव असल्याचे कासले यांनी स्पष्ट केले.

“कणकवलीच्या विकासासाठी एकवटलेली ताकद गरजेची असून, त्यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेत शहर विकास आघाडीला पाठिंबा देत आहे,” असे श्री. राजू कासले यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!