माजी नगरसेवक उमेश कोरगावकरही रिंगणात
चार नव्या चेहऱ्यांना संधी…
सावंतवाडी : येथील ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात एकेकाळचे दीपक केसरकर समर्थक असलेल्या अफरोज राजगुरू व देवेंद्र टेमकर व क्षिप्रा सावंत या तीन माजी नगरसेवकांनी केसरकर यांची साथ सोडून ठाकरे शिवसेनेतून आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर कृतिका कोरगावकर, तेजल कोरगावकर, आर्या सुभेदार हे नवीन चेहरे आपले नशीब अनुभवण्याचा प्रयत्न करत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सीमा मठकर यांचे नाव फायनल झाले आहे. यात प्रभाग क्रमांक एक मधून अफरोज राजगुरू, शेखर सुभेदार, दोन मधून दीप्ती केसरकर, निकिता केसरकर तीन मधून गीता सुकी लिखिता केसरकर, चार मधून समीरा खलील, देवेंद्र टेमकर पाच मधून कृतिका कोरगावकर, उमेश कोरगावकर, सहा मधून तेजल कोरगावकर, शैलेश गवंडळकर, सात मधून आर्या सुभेदार, संदीप राणे, दहा मधून श्रुतिका दळवी, प्रदीप कांबळे यांच्या नावाचा समावेश आहे.