महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित
शहर विकास आघाडी बाबत आज निर्णय शक्य
कणकवली : कणकवली नगरपंचायत 2025 या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी त्याचबरोबर आगामी रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी सुरू झाली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत , कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, संकेत नाईक, उमेश वाळके, योगेश मुंज, सोहम वाळके, जयेश धुमाळे, सोमा गायकवाड, सुशील आळवे, तेजस राणे, सुदीप कांबळे, सुजित जाधव, दादा परब, दिव्या साळगावकर सी. आर. चव्हाण, अविनाश सावंत, वैभव मालांडकर, आदित्य सापळे यांचा सह शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमुख मान्यवर बैठकीत सहभागी झाले आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडी बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.