रुग्णाचा मृत्यू, ग्रामस्थ संतापले
…तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. राजेंद्र बळीराम गावडे (वय ५२, रा. वागदे) हे दोन दिवस उपचारासाठी रुग्णालयात आले होते.
६ नोव्हेंबर रोजी गावडे यांना उपचार देऊन घरी पाठविण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी ते पुन्हा रुग्णालयात आले. तपासणीनंतर त्यांचा ब्लड प्रेशर ५० तर प्लेटलेट ३६,००० होते. एवढे रुग्णाची स्थिती गंभीर असताना देखील त्या महिला डॉक्टरने रुग्णाला घरी पाठवले. घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच राजेंद्र गावडे यांचा मृत्यू झाला.
या प्रकारानंतर वागदे येथील ग्रामस्थ, भाजप पदाधिकारी तसेच वागदे सरपंच संदीप सावंत, अण्णा कोदे, लक्ष्मण घाडीगावकर, रुपेश आमडोसकर, संजय कामतेकर, समीर प्रभुगावकर, भिवा परब यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन वैद्यकीय अधिक्षक आणि महिला डॉक्टरना घेराव घालून जाब विचारला.
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पडळकर, उपनिरीक्षक महेश शेडगे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दाखल झाले होते.
घटनेची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ डॉ. सुबोध इंगळे यांना तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
यावेळी आरएमओ डॉ. सुबोध इंगळे यानी महिला डॉक्टर ला रुग्णाच्या स्थितीबाबत विचारणा केली. आपल्याकडे MD मेडिसिन डॉक्टर असताना त्यांच्या निदर्शनास का घातले गेले नाही. असा सवाल केला. महिला डॉक्टर वर कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले.
सरपंच संदीप सावंत या दरम्यान आक्रमक झाले. त्यांनी आरएमओ श्री. इंगळे यांना थेट कारवाई करा अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. जो रुग्ण मयत झाला त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घ्या, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या, अशी मागणी केली.
संजय कामतेकर यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांना भेटून घडलेल्या प्रकाराची माहीत घेतली. यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्ण सेवाय देता त्यावर आम्ही आणि रुग्णांनी काय विश्वासा ठेवायचा. त्या महिला डॉक्टरने अस का केलं ? वरिष्ठ डॉक्टर ना का कळवले नाही ? ३६ हजार प्लेटलेट असताना घरी का पाठवले ? हा निष्काळजीपणा नाही का ? रुग्णाची स्थिती गंभीत असताना त्यांना घरी का पाठवले ? रुग्णांना तपासण्यासाठी कोणाच बंधन होत का ? डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत, हे या कृतीतून स्पष्ट दिसत आहे. त्या महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल करा अशी मागणी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी केली.