देवगड : गडीताम्हणे येथील उबाठा पक्षाच्या सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा सेनेला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सौ. सुहासिनी सखाराम हिर्लेकर (सरपंच), काशिनाथ भांडे उर्फ बाबु भांडे (उपसरपंच), पापा कदम (शाखाप्रमुख), दत्ताराम सावंत, सत्यवान हीर्लेकर, अच्युत हिर्लेकर, सुमीत हिर्लेकर, तेजल कदम आणि युवराज हिर्लेकर यांचा समावेश आहे.
या प्रवेशामुळे गडीताम्हणे परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वेळी भाजपा कार्यकर्ते अमित कदम, भाजपा पदाधिकारी उत्तम बिरजे, माजी सभापती रवी पाळेकर, शरद ठुकरुळ, अमोल तेली, भूषण पोकळे,मंडल तालुकाध्यक्ष बंड्या नारकर फरीद काझी उपस्थित होते.