२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी
कणकवली : जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या चार नगरपरिषदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकांसाठी १० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे. यानंतर अर्जांची छाननी व उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीला आता अधिकृतपणे सुरुवात झाली असून, राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.