ब्युरो न्यूज : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचवण्यात अनेकदा अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत 108 प्रमाणेच 102 क्रमांकावर विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरू केल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
सध्या 108 सेवा अपघातग्रस्त, आपत्कालीन रुग्णांसाठी कार्यरत आहे. परंतु गरोदर महिला, जेष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजार असणारे रुग्ण यांना नियोजित प्रवासासाठी वाहतूक उपलब्ध नाही. 102 सेवा सुरु झाल्यास हे रुग्ण घरापासून उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवता येतील.
१०२ रुग्णवाहिका केवळ ठराविक सेव्ह पुरते वापरले जाते. मात्र वस्तुस्थिती पाहिली तर त्या सेवा देणारे डॉक्टर काही ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात उपलब्धच नाहीत. त्यामुळे या गाड्या धूळ खात उभ्याच असतात. त्यात अति गंभीर रुग्णांना उपचारासाठी या गाड्यांचा वापर करण्यात आला तर काही अडचण नसावी. मात्र प्रशासन कशाची वाट पाहत आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.