-7.5 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

आमच्या ‘हृदया’त दीपक केसरकर !

लाखे बांधवांचा खुलासा; प्रवेश रिटर्न?

सावंतवाडी : आमच्या हृदयात दीपक केसरकर आहेत. मेलो तरी त्यांच्यासाठी मरू, फसवणूक करून आम्हाला घेऊन गेले. भाजपात आम्ही प्रवेश केलेला नाही, असे स्पष्टीकरण लाखे वस्तीतील महिलांनी दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत त्यांनी हा खुलासा केला. भाजप प्रवे-शानंतर अवघ्या काही तासांत शिवसेनेन हा धक्का दिला आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले की, फसवणूक करून भाजप प्रवेश दाखवला गेला. हे लोक दीपक केसरकर यांच्यासोबतच आहेत. उद्घाटन असल्याचे सांगून खोटा प्रवेश दाखवल्याचा टोला श्री. परब यांनी हाणला. यावेळी महीला जिल्हाप्रमुख अॅड. नीता सावंत-कविटकर, शहरप्र-मुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, परिक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, क्लेटस फर्नांडिस, भारती मोरे, संजय पेडणेकर, सुजित कोरगावकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!