बांदा – सावंतवाडी राज्यमार्ग काही काळ ठप्प
बघ्याची मोठी गर्दी…
बांदा : काल सायंकाळी उशिरा इन्सुली गावात दाखल झालेल्या ओंकार हत्तीने आज सकाळीच बांदा सावंतवाडी मार्ग रोखून धरला. आज सकाळी इन्सुली चर्चजवळ त्याने ठिय्या मांडल्याने रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूकडून थांबवून ठेवण्यात आली. ओंकार हत्तीने काल सायंकाळी मुंबई गोवा महामार्ग ओलांडत इन्सुली गावात प्रवेश केला होता. रात्रभर त्याचा वावर इन्सुलीतील सावंतटेम्ब व कुडवटेम्ब परिसरात होता. आज सकाळी त्याने बांदा सावंतवाडी रस्त्यावर येत रस्ता रोखला. वनविभागाचे कर्मचारी त्याला जंगल परिसरात हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने थांबवून ठेवण्यात आली असून बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.