11.7 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

वैभववाडी-कोकिसरे, गडमठ, लोरे नं.२, नापणे येथील उबाठाचे शेकडो पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे वैभववाडीत उबाठा पक्ष समूळ गारद

मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशाचा ओघ सुरू

वैभववाडी : तालुक्यातील कोकिसरे बांधवाडी, गडमठ, लोरे नं.२, नापणे परिसरातील उ.बा.ठा. पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. कोकिसरे माजी सरपंच राजाराम गडकर यांच्यासह अनेक शिवसैनिक भाजपत दाखल होताच, कोकिसरे गावातून उबाठा पक्षाचे समूळ उच्चाटन झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.नापणे येथील तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य पांडुरंग पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने सुद्धा उबाठा ला धक्का बसला आहे.
माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रवेशानंतर वैभववाडीतील उबाठा पक्षात उरलंसुरलं ताकद नसल्याचे स्पष्ट दिसत असून, राणे यांच्या नेतृत्वाखाली दररोज कार्यकर्ते भाजपत दाखल होत आहेत. या प्रवेशामुळे वैभववाडीत उबाठा पूर्णत्वास गारद झाल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
या वेळी माजी शाखाप्रमुख विलास कदम, माजी शाखा प्रमुख विजय मसुरकर, युवासेना प्रमुख नागेश आडके, राजाराम आडके, जयेंद्र कुळी, तुषार घाडी, दीपक कदम, नितीन सावंत, जयवंत साटम, सत्यवान साटम, देविदास नार्वेकर, विजय कदम, संतोष कदम, राजेंद्र आडके, संदीप आडके, गणेश आडके, विजय मसूरकर, सदानंद साटम, शंकर कदम, दिनकर कदम, अंकुश लाड, दत्ताराम कुळी, राजाराम गडकर, प्रकाश आमरसकर, प्रकाश विटेकर, प्रकाश पर्वते, चंद्रकांत गवाळे तसेच लोरे नं.२ येथील बुथ प्रमुख नारायण म्हदेव, तर नापणे येथील तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य पांडुरंग पाटील यांच्यासह असंख्य उबाठा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतला. या प्रवेशानंतर उबाठाचा पत्ताच उरला नसल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे बँक संचालक दिलीप राव राणे , माजी सभापती बंड्या मांजरेकर, मंगेश लोके, किशोर कांबळे, बंटी रावराणे,उमेश पवार, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!