11.7 C
New York
Thursday, October 23, 2025

Buy now

कणकवली नगरपंचायत मध्ये २०० हुन अधिक दुबार मतदार

कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल करणार

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

कणकवली – आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 15 दिवसांच्या फरकावर या निवडणुका पार पडतील अशी आकांशा सर्व जनतेची आहे. असे असताना काही गावातील नागरिकांचे मतदान हे नगरपंचायत भागात आहे व ग्रामीण भागात पण आहे. हे नागरिक दोन्ही ठिकाणी मतदान करतात. अश्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्याचा हक्क दिला पाहिजे. काही मतदार जर दोन्ही ठिकाणी मतदान करत असतील तर त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे व दुबार मतदान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील मतदारयादीत दुबार नाव नोंदणी ही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच एका घराच्या सातबारा वर 25 ते 30 मतदार दाखविण्यात आले आहेत. असे असताना या दाखविण्यात आलेल्या मतदारांचे भाडेकरार घेतले जाते का याची प्रशासनाने पाहणी करावी.काही गावातील नागरिकांचे मतदान हे नगरपंचायत भागात आहे व ग्रामीण भागात पण आहे. हे नागरिक दोन्ही ठिकाणी मतदान करतात. अश्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्याचा हक्क दिला पाहिजे. काही मतदार जर दोन्ही ठिकाणी मतदान करत असतील तर त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे व दुबार मतदान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उमेश वाळके, रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, तेजस राणे, वैभव मालंडकर, योगेश मुंज यांनी आज कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले व योग्य ती कारवाई करा अशी मागणी केली. मतदार हे जिल्हा परिषद व नगरपंचायत अश्या दोन्ही ठिकाणी जर मतदान करत असतील व आम्ही मागणी करून देखील प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसेल तर आम्ही असे दुबार मतदान करणाऱ्या मतदारांनवर व कारवाई न केल्यास प्रशासनावर कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले.
तसेच कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील 17 वॉर्ड ची विभागणी आपण केली यात मोठ्या प्रमाणात फेरबदल आहेत. प्रशासनाची एक जबाबदारी होती, आपण ठरवलेल्या सीमेनुसार म्हणजे रस्ते, व्हाळ या हद्दीनुसार वॉर्ड तयार केले असून त्या वॉर्ड च्या हद्दीनुसारच आपण मतदार यादी करणे अपेक्षित होते. आता मात्र 17 ही वॉर्ड मध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल आहेत. आपण ठरवलेल्या हद्दीतील मतदार हे दुसऱ्या वॉर्ड मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे. हे सर्व बदल आपण ठरवलेल्या सीमेनुसार करणे याची पूर्णता जबाबदारी ही प्रशासनाची आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!