ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रीयेत सहभागी उमेदवारांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे या उद्येशाने जिल्हा बँकेने विनामुल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला असून त्याचा लाभ घ्यावा. व या भरती प्रक्रीयेसंदर्भात कोणत्याही अपप्रचार व भुलथापांना बळी न पडता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी यांनी प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
ज्या उमेदवारांनी बँकेच्या संकेतस्थळावर आपला ऑनलाईन अर्ज भरला आहे. त्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार असून बँकेच्या www.sindhudurgdcc.com या संकेतस्थळावर आपल्या व्हाटस् अॅप नंबर, परिक्षा अर्ज नोंदणी क्रमांकासहीत आपली नाव नोंदणी दि. १०/१०/२०२५ पुर्वी करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणासाठी नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांना टप्प्या टप्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेदवारांना कोणत्या दिवशी प्रशिक्षणास उपस्थित राहावयाचे आहे याची पूर्व कल्पना त्यांना मॅसेजव्दारे, व्हाटस् अॅपद्वारे आगाऊ देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे संचालक श्री. व्हीक्टर डांन्टस, श्री. महेश सारंग, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे हे उपस्थित होते.