सिंगापूर मधील संभाव्य गुंतवणुकीच्या संधींबाबत झाली चर्चा
पर्यटनाला चालना व रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यात मनोरंजन केंद्राचा प्रस्ताव
मुंबई : महाराष्ट्र जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण–2025 अंतर्गत सिंगापूरमधील संभाव्य गुंतवणुकीच्या संधी तसेच दिनांक २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुंबई येथे भारत सागरी सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सागरी क्षेत्रातील सिंगापूरस्थित कंपन्यांच्या सहभागाबाबत आज मंत्रालयात मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक करण्यात आली होती.
या बैठकीत सिंगापूरच्या विविध जहाज बांधणी व सागरी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांकडून राज्यातील जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या संधींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या आढावा बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक मनोरंजन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. या मनोरंजन केंद्रासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस श्री.वोंग वेई कांग, प्रादेशिक संचालक (पश्चिम भारत), एंटरप्राइज सिंगापूर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप यांसह संबंधित अधिकरी उपस्थित होते.