13.1 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

KUDAL | कुडाळ नगरपंचायतीला तब्बल ६ कोटी ९६ लाखांचा विक्रमी निधी

नगरपंचायत स्थापनेपासून प्रथमच एवढा मोठा निधी मंजूर

कुडाळ : कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ नगरपंचायतीसाठी तब्बल ६ कोटी ९६ लाखांचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. नगरपंचायतीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या निधीची मंजुरी ही पहिलीच वेळ आहे.

हा निधी सर्व १७ प्रभागांच्या विकासकामांसाठी मंजूर झाला असून यात रस्ते, गणेश घाट, गटारे, ई-चार्जिंग स्टेशन, काही प्रभागांमधील उद्याने, गोधडवाडी दत्तनगर आणि नाबरवाडी परिसरांसाठी नळपाणी योजना, सोलर हायमास्ट, संरक्षक भिंत, स्मशानभूमीतील कामे आदींचा समावेश आहे.

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी शहरातील सर्वांगीण विकासासाठी आमदार राणे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार एकूण ६८ विकासकामांना जिल्हा नियोजन समितीमार्फत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंजुरी देण्यात आली.

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे “नगरोत्थान जिल्हास्तर २०२५” अंतर्गत हा निधी मंजूर झाला असून, उर्वरित कामांसाठी लागणारा निधीही लवकरच मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे कुडाळवासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!