कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी कणकवली येथे भारतीय जनता पार्टी तालुका वतीने आयोजित नवरात्र उत्सवाला भेट दिली. त्यांनी दुर्गामातेची आरती करून आशीर्वाद घेतला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा सत्कार केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, दिलीप तळेकर, समीर प्रभूगावकर, बबलू सावंत, अण्णा कोदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.