कणकवली : कणकवलीसह आजुबाजूच्या परिसरात सोमवारी नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामातेची प्रतिष्ठापना उत्साहात पार पडली. कणकवली शहरात तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच शहरात अन्य ठिकाणी , दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.
त्याचप्रमाणे विविध देवी मंदिरांमध्ये व घरगुती मंडळांत विधीवत पूजा-अर्चा करून दुर्गामातेला आरती आणि ढोल – ताशांच्या गजरात विराजमान करण्यात आले.
भक्तगणांनी सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. फुलांनी सजवलेले मंडप, रंगीबेरंगी लाईट्स आणि भजने, दशावतार, फुगडी नृत्य यामुळे संपूर्ण कणकवली शहरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत रोज नवदुर्गेची पूजा करण्यात येणार असून, आरती, भजन, डबलबारी, दशावतार यांसह सांस्कृतीक कार्यक्रम व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.