महिला गंभीर जखमी
कणकवली : गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने पटवर्धन चौकात दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याला शुक्रवारी रात्री १०:४५ वाजता जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर कारचालकाने कार (आरजे ०६ सीडी ८०१०) पुन्हा वळवून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी पुजारी इलेक्ट्रॉनिक्ससमोर त्याला पकडून चोप दिल