सिंधुदुर्गनगरी : गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.15 वाजता शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथून मोटारीने श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, (स्थळ:- श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी), सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील विविध विभागांच्या विषयांवर आढावा बैठक (स्थळ:-वैश्यभवन हॉल, गवळीतिठा, ता. सावंतवाडी), दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत मालवण विधानसभा क्षेत्रातील विविध विभागांच्या विषयांवर आढावा बैठक (स्थळ:- महालक्ष्मी मंगल कार्यालय, हॉटेल गुलमोहर नजीक, ता. कुडाळ), दुपारी 3.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत कणकवली विधानसभा क्षेत्रातील विविध विभागांच्या विषयांवर आढावा बैठक (स्थळ:- भगवती मंगल कार्यालय, मराठा मंडळ रोड, ता. कणकवली), सायांकळी 6.40 वाजता पंचायत समिती सभागृह, ता. कणकवली येथून एमआयडीसी विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण, रात्रौ 7.10 वाजता एमआयडीसी विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व मुक्काम.