दशावतारी कलाकारांच्या आरोग्याची तपासणी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या माध्यमातून घेतली जाईल
भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची ग्वाही
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कला साता समुद्रापार गेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे, बबलू सावंत, दशावतारी कलाकार नाथा नालंग, पप्पू साटम, मारुती सावंत, गुरुनाथ मेस्त्री, पुरुषोत्तम खेडेकर, सुरेश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी, डॉ. सचिन डोंगरे, डॉ. देशमुख, वैभव फाले, श्रीम. सी. आर. सावंत, श्रीम. पी. डी. कदम, श्रीम. शितल सावंत, श्रीम. कविता राऊळ, श्रीम. व्ही. जी. जाधव, कक्षसेवक सुनील यादव, ईसीजी तज्ञ किसन ठोंबरे, श्रीम. दाभोलकर, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, यांच्यासह उपजिल्हा रुग्णालय कणकवली चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांची मोफत आरोग्य तपासणी महाराष्ट्रात पहिल्यांदाच करण्यात आली, असल्याने दशावतारी कलाकारांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी उपस्थित कलाकारांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या कलेचेही कौतुक केले. याचबरोबर सिंधुदुर्ग आरोग्य विभागाची दशावतार कलाकारांना रुग्ण सेवेबाबत जि मदत लागेल ती वेळोवेळी मिळेल असा विश्वास देखील दिला.