सिंधुदुर्गनगरी : कुडाळ व कणकवली पोस्ट ऑफिस मधील रजिस्टर, स्पीड, पार्सल बुकिंग सेवांची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, कणकवली या भागातील सर्व नागरीकांनी तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थानी यांची नोंद घेऊन वाढीव वेळेत जास्तीत जास्त रजिस्टर, स्पीड व पार्सल्स बुक करावीत, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक, नंदकुमार कुरळपकर यांनी केले आहे.
भारतीय डाक विभागाव्दारे रजिस्टर, स्पीड, पार्सल तसेच आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग सेवा दिल्या जातात. ग्राहकांची वाढती गरज तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था ई. सर्वच स्तरावरील रजिष्टर, स्पीड, पार्सल ई. बुकिंग मधील वाढती गरज लक्षात घेऊन सिंधुदुर्गगनगरी, कुडाळ व कणकवली या तीन मुख्य डाकघरांमध्ये आता या सेवांचा वेळ एक तासाने वाढविण्यात आला आहे. त्यामुळे जनतेने सकाळी ९ ते ४ या वेळेत सेवेचा लाभ घेता येणार आहे.