कणकवली : कणकवली, पटकीदेवी येथील सूर्यकांत गोपाळ हर्णे (वय ८५) यांचे मंगळवारी रात्री ओरोस जिल्हा रुग्णालय उपचारादरम्यान निधन झाले. कफ व गॅसचा त्रास असल्याने उपचारासाठी त्यांना २६ ऑगस्ट रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद कणकवली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.