22.8 C
New York
Monday, August 25, 2025

Buy now

कणकवलीत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तरुणाई धावली

स्पोर्ट्स फाउंडेशन , कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजन

मॅरेथॉन स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांसह अबाल वृध्दांनी घेतला सहभाग

कणकवली : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, कणकवली तालुका पत्रकार संघ आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा सन 2025 आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटात आयोजित मॅरेथॉन स्पर्ध‌ेचा शुभारंभ झेंडा दाखवत अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे , पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री शुभांगी साठे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष बयाजी बुराण, स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष बाळकृष्ण कदम, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक तथा कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड, पत्रकार संघाचे सचिव संजय सावंत, सहसचिव दर्शन सावंत, पत्रकार मिलिंद पारकर,स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गचे सेक्रेटरी डी.डी सावंत,दशरथ घाडीगांवकर,असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत पाटील, प्रा.हरिभाऊ भिसे, तथास्तु फिजिओथेरपी सेंटर कणकवली चे डॉ.राहुल जगताप,बॉडी टेंपल फिटनेस सेंटर कणकवलीचे श्री.गुरव,तायक्वांडो जिल्हा असोसिएशनचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, एकनाथ धनवटे,कोकण डिस्ट्रीब्यूटरचे साई घाडी,पंच मंदार परब, अविराज खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार भाई चव्हाण , समीर राऊत,कराटे कोच साई दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

या मॅरेथॉन स्पर्धेत १२ वर्षाखालील मुले मुली, 14 वर्षाखालील मुले मुली, १७ वर्षाखालील मुले मुली, 19 वर्षाखालील मुले मुली व खुला गट महिला व पुरुष अशा एकुण ५ गटात जिल्ह्यातील सुमारे ३५० पेक्षा अधिक धावपट्टूंनी सहभाग घेतला.या मॅरेथॉनसाठी कणकवली कॉलेज ते हरकुळ इंजिनिअरिंग कॉलेज असा रन वे 5 किलोमीटर ठेवण्यात आला होता. या स्पर्धे दरम्यान कनेडी विद्यालयातील एनसीसी पथकाने कु.आर्या सावंत हिच्या नेतृत्वाखाली वाहतूक नियंत्रणाची प्रमुख भूमिका पार पाडली.
या भव्य स्पर्धेला पंच म्हणून समीर राऊत,प्रज्ञेचा निग्रे,प्रा.दिवाकर पवार,एकनाथ धनवटे,मंदार परब,अविराज खांडेकर,अस्मि कानेकर,युगा सावंत,निकिता लाड, कु.नम्रता घाडीगांवकर तसेच स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गच्या इतर पंचांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय मारकड व बाळकृष्ण कदम यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!