कणकवली तालुक्यातील साकेडी येथील महिलेवर पोलिसांची कारवाई
२३,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कणकवली : तालुक्यातील साकेडी बोरिचिवाडी येथे अवैध गावठी दारुसह दारू बनविण्याचे रसायन व साहित्य असे मिळून एकूण २३,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी १.३० वा.च्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी साकेडी येथील बितोज जुवाव म्हापसेकर (वय ७५) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बितोज म्हापसेकर ही वृध्द महिला तिच्या राहत्या घराच्या बाजूस असलेल्या मांगराच्या उघड्या पडवीत गोवा बनावटीची दारु व गावठी दारुची अवैध विक्री करते अशी गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने कणकवली पोलिस ठाणेचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.