25.5 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

एसटी बस प्रशासनाच्या आगळ्यावेगळ्या नियोजनाची प्रवाश्यांना डोकेदुखी

गौरी गणपतीसाठी कणकवली बसस्थानकातून ४३ बसफेऱ्या रद्द

प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त

कणकवली : गौरी-गणपतीसाठी सिंधुदुर्ग विभागातील काही बसेस मुंबईत पाठविण्यात आल्या आहेत तर काही बस पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे २३ ते २६ ऑगस्ट कालावधीत कणकवली आगारातील नियमित ४३ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

यामध्ये कणकवली – लातूर, कणकवली – सावंतवाडी, कणकवली – अजगणी- मालवण, कणकवली – देवगड, कणकवली – रत्नागिरी, कणकवली – लातूर, कणकवली – दिर्बादेवी, कणकवली – सावंतवाडी, कणकवली – भटवाडी, कणकवली – बेळगाव, कणकवली – कळसुली, कणकवली – देवगड, कणकवली – बावशी – ओटव, कणकवली – नारकरवाडी, कणकवली – सोलापूर, कणकवली – सावंतवाडी, कणकवली – पिसेकामते, कणकवली – देवगड, कणकवली – अजगणी, कणकवली – नरडवे, मसुरे, कणकवली – तळेरे, कणकवली – कनेडी – खलांतर, खारेपाटण – कणकवली, कणकवली – कणकवली-करूळ-फोंडा, कणकवली – किर्लोस, कणकवली – हुंबरणे, कणकवली – सावंतवाडी, कणकवली – नरवडे, कणकवली – देवगड, कणकवली – मौदे, कणकवली – निपाणी, कणकवली – गाणगापूर, कणकवली – सावंतवाडी, कणकवली – शिरगाव, कणकवली – आचरा वस्ती, कणकवली – आयनलवस्ती, तळेरे – खारेपाटण, कणकवली – नारकरवाडी, कणकवली – हुंबरणे, कणकवली – कळसुर्ली – बोर्डवे वस्ती, कणकवली – कुंभवडे वस्ती या फेऱ्यांचा समावेश आहे.

या नियोजनामुळे शहरी व ग्रामीण भागातील अशा ४३ बस फेऱ्या रद्द केल्याने प्रवाश्यांवर ऐन गणेशोत्सवातच संकट म्हणावं लागणार आहे. आज कणकवली बस स्थानकावर १२ वाजल्यानंतर शेकडो प्रवाश्यांची गर्दी झाली होती. अनेक लोकांना बस फेऱ्या रद्द झाल्याबाबत काहीच माहिती नव्हते. नोटीस लावलेली शंभरातून दहा जणांना दिसली, मग बाकीच्यांचे काय ? जर स्थानिक फेऱ्या रद्द केल्या तर नेहेमीच्या प्रवाश्यांना पर्याय काय ? हे नियोजन कोणत्या पद्धतीचे ? असे एक ना अनेक प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित केले जात आहे.

त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी एसटी प्रशासनाचे हे आगळेवेगळे नियोजन प्रवाश्यांना मात्र डोकेदुखी ठरणार आहे. याबाबत एसटीच्या जबाबदार अधिकऱ्यांना फोन द्वारे संपर्क केला असता नेहेमीप्रमाणे फोन न उचलणे, संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाश्यांना वाली कोण ? सिंधुदुर्गचे पालकमंत्री या गंभीर समस्येकडे लक्ष देतील का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!