साधारणपणे ६५५५० रुपयांचे झाले नुकसान
कणकवली : तालुक्यात मंगळवारी कोसळलेल्या पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. याचबरोबर जोरदार सुटलेल्या वाऱ्यांमुळे काही ठिकाणी घराचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोर्डवे व हरकुळ बुद्रुक येथील दोन घरांचे साधारणपणे ६५,५५० रुपयांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये बोर्डवे येथील अशोक केशव घाडीगावकर यांच्या घराचे वासे, कौल, पडून १०,५५० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर हरकुळ बुद्रुक येथील हुसेनशा अलीशा पटेल यांच्या राहत्या घराचे छप्पर वाऱ्याने गेल्यामुळे ५५००० रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी जात पंचनामे केले, असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग कणकवली यांच्याकडून देण्यात आली.