नद्यांची पाणी पातळी देखील झाली कमी
पाण्याखाली गेलेले रस्ते वाहतुकीस सुरू
खबरदारी घेण्याचे प्रशासनाच्या सूचना
कणकवली : मागील चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत होता. अशातच सोमवार आणि मंगळवारी पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक ठिकणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुले शहरी – ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी राज्य मार्ग देखील बंद होते. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले होते.
मंगळवारी मध्यरात्रीपासून ते बुधवारी सकाळी पर्यंत पावसाचा वेग काहीसा मंदावला आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देखील जारी केला आहे. मंगळवारी रात्रीपासून पाऊस कमी झाला असल्याने नद्यांची पाणी पातळी देखील कमी होत आहे. अनेक ठिकाणी पाणी आल्याने बंद झालेले रस्ते वाहतुकीस सुरळीत पणे सुरू झाले आहेत. मात्र पाऊस मंदावला असला तरी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. याचीच खबरदारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पाऊस कमी असला तरी कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नका, पाण्याच्या ठिकाणी जाऊ नका असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे.