जखमींवर नांदगाव आरोग्य केंद्रात उपचार करून उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे हलविले
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव येथील नांदगाव केंद्र शाळा नंबर १ नजिक हायवेवरील खड्डयात दुचाकी आदळून सायंकाळी ७:३० वा. च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले स्मिता सुनील गावडे ( वय ५२ )
सुनील दत्तात्रय गावडे ( वय ५५ रा. शिरगाव ) हे दोघे पती पत्नी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांना नरेंद्र महाराज रुग्णवाहीकेतून येथील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी कणकवलीत दाखल करण्यात आले आहे.
महामार्गावरील खड्डयांबाबत हायवे प्राधिकरणचे वारंवार लक्ष वेधुनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.