20.6 C
New York
Wednesday, August 20, 2025

Buy now

सिंधुदुर्गला पावसाने झोपडले

कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गडनदी भरली तुंडुंब ; अनेक रस्ते पाण्याखाली

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवस संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला २१ ऑगस्ट पर्यंत रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मात्र रविवारी रात्रीपासून ते सोमवार दुपार पर्यंत मुसळधार पाऊस कोसळला आणि अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी नद्या नाले तुडुंब भरून वाहत होते. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.

कणकवली तालुक्यातील आचरा मार्गावर उर्सुलास्कुल नजीक गडनदीचे पाणी भरल्यामुळे आचराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे या मार्गाने जाणारी वाहतूक बिडवाडी मार्गे वळवण्यात आली. तसेच सातरल – कासरल रस्त्यावर येथे पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. कणकवली तालुलक्यात भिरवंडे रामेश्वर मंदिर नजीकच्या मोरीवर पाणी भरलेले आहे, अशा अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली परिणामी जनजीवन विस्कळीत झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!