कणकवली : शहरातील तेलीआळी येथील रहिवासी व ‘शैलेंद्र सायकल मार्ट’ चे मालक बबन सीताराम नेरकर (७५) यांचे बुधवार, १३ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कणकवली शहरातील जुन्या काळचे सायकल मार्ट असलेल्या ‘शैलेंद्र सायकल मार्ट’ येथून अनेक जण त्या काळी सायकल भाड्याने घेऊन चालवीत असत.
अगदी लहान सायकलींपासून मोठ्या सायकली त्यांच्या दुकानात भाडेतत्वावर उपलब्ध असत. त्यामुळे सायकल भाड्याने घेऊन चालविणारी एक पिढी आजही त्यांच्या दुकानाची आठवण काढते. जुन्या काळापासून सुरू असलेला हा व्यवसाय त्यांनी अद्यापही सुरू ठेवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र नेरकर यांचे ते वडील होत.