सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे खा. नारायण राणे यांच्याहस्ते उद्घाटन
पालकमंत्री ना.नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती
कणकवली ( मयुर ठाकूर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा! या धबधब्याच सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर येथील कामही पूर्ण करण्यात आले. या नूतनीकरणाच्या कामाचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना दिवशी उद्घाटन संपन्न झाले.