13.8 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

सावंतवाडीत तब्बल १२५ फुटी तिरंग्याची रॅली

सावंतवाडी : तब्बल १२५ फूट लांबीचा तिरंगा ध्वज काढून येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळी शहरातूनही तिरंगा रॅली काढण्यात आली. या उपक्रमात शंभर विद्यार्थ्यांसह पन्नासहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबाबत नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. या रॅलीची सुरुवात सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत निर्माण भवन येथून झाली. ही रॅली जगन्नाथ भोसले उद्यानामार्गे पुढे सरकली. मोती तलाव काठावरून मार्गक्रमण करत ही रॅली केशवसुत कट्टयाजवळील शिवरामराजे पुतळ्यापाशी पोहोचली. या ठिकाणी या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय..!!”, “वंदे मातरम्..!!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. १२५ फुटी लांब तिरंगा ध्वज या रॅलीचे खास आकर्षण ठरला. या रॅलीच्या माध्यमातून मिलाग्रीस हायस्कूलने समाजात देशभक्तीचा संदेश पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या कार्यक्रमात सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सहभाग होता. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर, मराठी प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी, इंग्लिश प्रायमरीच्या पर्यवेक्षिका क्लिटा परेरा तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!