22.2 C
New York
Monday, August 11, 2025

Buy now

शेत विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

देवगड : जामसंडे येथील शेत विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. संतोष मोहन कदम (वय ४२, रा. सोहनीवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक माहिती की, संतोष कदम मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ते शुक्रवारी सकाळी ८ वाजता कामासाठी घराबाहेर पडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शनिवारी दिवसभर कुटुंबीय आणि गावकरी त्यांचा शोध घेत होते. काल सायंकाळी ६.३० च्या सुमारास संतोष यांचा मुलगा दयानंद याला सोहनीवाडी येथील भोवर यांच्या शेतातील विहिरीत वडिलांचा मृतदेह तरंगताना दिसला. त्याने तातडीने गावकऱ्यांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच, सहाय्यक उपनिरीक्षक अनिलकुमार पवार, पोलिस हवालदार आशिष कदम, विश्वास पाटील आणि होमगार्ड जोईल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. संतोष कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!