13.9 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

रक्तदानाबरोबरच अवयवदान देखील सर्वश्रेष्ठ – रोटरी क्लब अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे

कणकवली शहरात देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदानबाबत निघाली जनजागृती रॅली

कणकवली : रक्तदानाबरोबरच जगामध्ये सर्वश्रेष्ठ अवयवदान देखील आहे. परंतु अजूनही म्हणावी तेवढी या अवयवदानाची जनजागृती झालेली नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी केले. त्यामुळे हा आठवडाभर जनजागृती अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे, असेही श्री. रावराणे म्हणाले.

दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन महाराष्ट्र, रोटरी क्लब कणकवली, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, पेन्शनर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने कणकवली शहरात देहदान, नेत्रदान, त्वचा दान, अवयव दान याबाबतची जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, डॉ. विद्याधर तायशेटे, प्रमोद लिमये, मेघा गांगण, रमेश मालवीय, राजश्री रावराणे, ॲड. दीपक अंधारी, महिंद्र मुरकर, गुरु पावसकर, नितीन बांदेकर, संतोष कांबळे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे आबा मराठे, राजस रेगे, पेन्शनर्स असोसिएशनचे प्रा. हरिभाऊ भिसे, अनुप्रिया रेगे, रिमा भोसले, भोसले सर, आणि आयडियल स्कूल चे विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

नेत्रदान करा अंधाना प्रकाश दाखवा, अवयव जपा मृत्यू नंतर दान करा, मरावे परी अवयव रूपी उरावे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी डॉक्टर विद्याधर तायशेटे व प्रमोद लिमये यांनी अवयव दान का केले पाहिजे आणि कसे केले पाहिजे याविषयी उवस्थितांना मार्गदर्शन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!