सावंतवाडी : आरोस – नाबरवाडी येथील महिलेने घराच्या बाजूला असलेल्या काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. जयश्री तुकाराम रेडकर ( वय ६५ ,रा. नाबरवाडी ) असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
आत्महत्या मागचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत त्यांचा मुलगा गोपाळ तुकाराम रेडकर यांनी दिलेला खबरीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्या गेले काही दिवस आजारी होत्या. त्यामुळे आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.