23.3 C
New York
Tuesday, August 19, 2025

Buy now

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

गणेशोत्सव काळात कणकवली शहरात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी उपाययोजना करा

महावितरण विभागाने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा

तसेच उड्डाणपूलाखालील विक्रेत्यांना नियमांचे पालन करण्याच्या केल्या सूचना

कणकवली : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्था, विजवीतरणाच्या समस्या व अन्य शासकीय विभाग प्रमुखांच्या येथील कणकवली नगरपंचायत हॉल मध्ये बैठक पार पडली. यामध्ये नगरपंच्यातच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी गणेशोत्सव काळात शहरात वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात. शहरात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता महावितरणने घ्यावी, उड्डाणपुलाखाली विक्रेत्यांना सर्व्हिस रोडवर बसू देऊ नका, अशा सूचना दिल्या.

यावेळी न. पं. प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळी, वाहतूक पोलीस दिलीप पाटील, पोलीस हवालदार श्री. कळंत्रे, मंगेश बावधने यांच्यासह महावितरण व नगरपंचायतचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे मुख्याधिकारी गौरी पाटील म्हणाल्या, गणेशोत्सवावेळी खरेदीसाठी मोठ्या संख्येने चाकरमानी व नागरिक शहरात येतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असते. शहरातील मुख्य चौकात कणकवली-आचरा मार्गासह शहरातील अन्य भागांत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे यावर्षी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी उपाययोजना कराव्यात. कणकवली – आचरा मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किनईरस्ता मार्गे वाहने वळवीत, सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता डी.पी. रस्त्यावर दुचाकी पार्किंची व्यवस्था करावी, उड्डाणपुलाखाली चारचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था करावी, गणेशोत्सव काळात सर्व्हिस रस्त्याने अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी. सर्व्हिस रस्त्यालगत नो पार्किंचे बोर्ड लावण्यात यावे, किनई रस्ता येथे एकदिशा मार्गचा बोर्ड लावणं गरजेचे आहे, बाजारपेठेत अवजड वाहनांवर प्रवेश बंदी करावी, यासह अन्य सूचनाही मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी पोलीस प्रशासनाला केल्या.

महावितरण विभागाने शहरात वीज विषयक कामे सुरू केली आहेत. सदरची कामे पूर्ण करताना गणेशोत्सव काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. उड्डाणपुलाखालील विक्रेते सर्व्हिस रस्त्यावर बसणार नाही, यासाठी सर्व्हिस रस्त्यापासून तीन फूट विक्रेत्यांना बसवावे, याकरिता न. पं. च्या कर्मचाऱ्यांनी रेषा निश्चित करून त्यांना बसण्याची सूचना करावी, असे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!