सावंतवाडी : आगीचा भडका उडाल्यामुळे देवसू- दाणोली येथील महिला भाजली आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात घडली. सुवर्णा संतोष डोईफोडे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डोईफोडे आपल्या न्हाणी घरात आग पेटवण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी चुलीत आज पेटवण्यासाठी डिझेल ओतले. मात्र माचीस लावल्यानंतर आगीने भडका घेतला. यात त्यांच्या अंगावरील कपडे जळाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले.