सावंतवाडी : रुग्णांना सोईचे व्हावे यासाठी सावंतवाडी नंतर दोडामार्ग आणि वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात लवकरच प्रत्येकी दोन डायलिसिस मशीन बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या मशीनचे लोकार्पण आज श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे, डॉ. गिरीशकुमार चौगुले, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, शर्वरी धारगावकर, सुरेंद्र बांदेकर, देव्या सूर्याजी, परीक्षित मांजरेकर, डाॅ. सुबोध इंगळे, डाॅ. संदीप सावंत, डाॅ. सागर जाधव डाॅ. निखिल अवधूत, भारती मोरे, नारायण राणे, पांडुरंग वजराटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.