27.7 C
New York
Tuesday, July 29, 2025

Buy now

ट्रॅफिक पोलिसाला हायड्रा चालकाने चिरडले

नवी मुंबई : नवी मुंबईतील महापे एमआयडीसीप रिसरात एका हायड्रा चालकाने ट्रॅफिक पोलीस गणेश पाटील यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हायड्रा चालकाला अटक केली आहे. गुरुवारी (२४ जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ट्रॅफिक पोलीस गणेश पाटील हे रस्त्याच्याकडेला कर्तव्यावर तैनात होते.

यावेळी एका हायड्रा चालकाने वाहन चुकीच्या बाजूला वळवले. यात गणेश पाटील हे चिरडले गेले. या अपघातात गंभीर जखमी झालेले कॉन्स्टेबल गणेश पाटील यांना तातडीने वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी गणेश पाटील यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी हायड्रा चालकाला ताब्यात घेतले असून घटनेची नोंद केली आहे. आमचा सहकारी गमावल्याने दुःख असल्याची प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!