कणकवली : भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी शनिवारी कणकवली शहर मंडल कार्यकारिणी जाहीर केली. येथील खासदार नारायण राणे संपर्क कार्यालयात श्री. साटम व कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी नव्या कार्यकारिणीची माहिती दिली. सध्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. यातील नव्या व जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आली आहे. तर पक्षाच्या अनेक सेल्स असून पदापासून वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यांचा या वेगवेगळ्या सेलची पदे दिली जाणार असल्याचेही साटम यांनी सांगितले.
नव्या कार्याकारिणीत उपाध्यक्षपदी सुशील सावंत, विजय भोगटे, चंद्रहास उर्फ बबलू सावंत, महिला उपाध्यक्षपदी भारती देसाई, संजना सदडेकर, सरचिटणीसपदी लक्ष्मण गावडे, किशोर राणे, सचिवपदी प्रशांत सावंत, समीर प्रभूगांवकर, गणेश तांबे, महिला सचिवपदी सिद्धीका जाधव, राजश्री पवार, साक्षी वाळके, कोषाध्यक्षपदी मंगेश तळगांवकर, कार्यकारिणी सदस्यपदी संजय शिरसाट, संजय सरवणकर, ऋतूराज तेंडोलकर, सुदाम तेली, आनंद शिंदे, श्रीकृष्ण घाडी, महेश शिरवलकर, संजय सावंत, भिवा वर्देकर, सुयोग माणगांवकर, व्यंकटेश सारंग, रामचंद्र घाडी, सुधीर सावंत, बुलंद पटेल, अविनाश गिरकर, सुदर्शन नाईक, गौतम खुडकर, सुशील कदम, हेमंत परुळेकर, प्रज्वल वर्दम, सुनील घाडीगांवकर, संजय ठाकूर, संतोष गुरव, राजन रासम, महिला सदस्यपदी वेदांगी पाताडे, आर्या वारंग, रुहिता तांबे, सुप्रिया कदम, अक्षया राणे, वैष्णवी सुतार, मेघा सावंत, प्रतिक्षा सावंत, पूजा चव्हाण, गितांजली कामत, सपना मेस्त्री, दिव्या पेडणेकर, स्मिता पावसकर, शोभा ढवळ, मयुरी मुंज, निमंत्रित सदस्यांमध्ये दिलीप उर्फ दादा भोगले, विठ्ठल देसाई, समीर सावंत, सुरेश ढवळ यांचा समावेश असल्याची माहिती श्री. साटम, श्री. मेस्त्री यांनी दिली.
साटम म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या आदेशानुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत नवे, जुने अशा सर्वांनाच सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापुढे प्रत्येक कार्यकर्त्याकडे पक्षाची जबाबदारी असणार आहे. येत्या काळात जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका होणार असून त्या अनुषंगाने नव्या कार्यकारिणीने कामाला लागावे, असे आवाहनही साटम यांनी केले.
पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, संजना सदडेकर, कळसुली सरपंच सचिन पारधिये, सुशील सावंत, प्रदीप गावडे आदी उपस्थित होते.