कणकवली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवारी डामरे ग्रामपंचायतच्यावतीने पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या माध्यमातून होणाऱ्या डामरे बौद्धवाडी अंतर्गत जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन मंगळवारी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच किरण कानडे, उपसरपंच सागर साटम, बुथप्रमुख अभिषेक सावंत, ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव, संतोष गावकर, माजी उपसरपंच दिगंबर जाधव, अनिल जाधव, सुभाष जाधव, अशोक जाधव, आकाश जाधव, वसंत जाधव, प्रभाकर जाधव, विश्वनाथ जाधव, सुनील जाधव, लवू जाधव, पांडुरंग जाधव, सिद्धार्थ जाधव ग्रामपंचायत कर्मचारी सौरभ जाधव इत्यादी उपस्थित होते.
सदरचा रस्ता होण्यासाठी येथील ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांच मोलाचं सहकार्य लाभले, असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.