24.5 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

लाच घेणारा तलाठी रंगेहात ताब्यात

अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग पथकाची मसुरे येथे कारवाई

मालवण : जमिनीच्या वारस तपासासाठी दोन अर्जदारांकडून चार हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारत असताना मसुरे तलाठी निलेश किसन दुधाळ (वय 26) यांना अँटी करप्शन ब्युरो, सिधुदुर्ग पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.

दरम्यान, निलेश दुधाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्यावतीने देण्यात आली.

निलेश दुधाळ हे मसुरे तलाठी म्हणून कार्यरत होते. दोन ग्रामस्थानी जमिनीचे वारस तपास करण्यासाठी तलाठी कार्यालयात जमा करण्यासाठी एका व्यक्तीकडे सर्व कागदपत्रे दिली होती. त्यांनी तलाठी कार्यालयात ती सर्व कागदपत्रे जमा केली. मात्र सदर दोन्ही अर्ज अनेक दिवस प्रलंबित होते. याबाबत तलाठी यांना विचारणा केली असता प्रत्येक वारस तपास अर्जासाठी दोन हजार याप्रमाणे चार हजार रुपये मागणी केली. दरम्यान याबाबत तलाठ्यांची तक्रार अँटिक्रप्शन करपशन सिंधुदुर्ग कार्यालयाकडे करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून सापळा रचण्यात आला. यात निलेश किसन दुधाळ हे चार हजार रुपये घेताना रंगेहात पकडून आले. त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अँटि करप्शन विभाग सिंधुदुर्ग पोलीस उप अधीक्षक विजय पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रीतम कदम, जनार्डन रेवंडकर, गोविंद तेली, विजय देसाई, अजित हंडे, स्वाती राऊळ, योगेश मुंडे यांच्या पथकाने केली आहे. ठाणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, सुहास शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई व पुढील तपास सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील मूळ असलेला सदर तलाठी काही महिन्यापूर्वी च मसुरे येथे आपल्या नोकरीची सुरुवात तलाठी या पदापासून केली होती परंतु नोकरीची सुरुवात असूनही पैसे घेताना सदर तलाठी रंगेहात पकडून आल्याने महसूल विभागात खळबळ माजली आहे..

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!