बाल विकास विभाग; अफवांना बळी पडू नका, नागरिकांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने अंतर्गत चार हजार रुपये दिले जातील, असा सोशल मीडियावर फिरणारा संदेश हा पूर्णतः खोटा आहे. त्यामुळे त्याला कोणी बळी पडू नये, असे आश्वासन जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. गेले काही दिवस सोशल मीडियावर मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अंतर्गत दोन्ही पालक अथवा एका पालकाचा मृत्यू झाल्यानंतर बालकाचे १८ वर्षे होईपर्यंत दोन बालकांना दर महिन्याला चार हजार रुपये मिळतील त्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज भरणे गरजेचे आहे, असा संदेश फिरत होता. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे, अशा प्रकारची कोणतीही योजना नाही, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.