33.6 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली : शहरातील सद्गुरू भालचंद्र महाराज जि. प. शाळा नंबर ३ मध्ये रानभाज्या पाककल्या स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयतेनुसार देवयानी राणे, दुर्वा परब, हार्दिक राणे, आयुष फोंडेकर, नेहल राणे, प्रगती कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत ६३ विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन गोपुरी आश्रमच्या संचालिका अर्पिता मुंबरकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका अक्षया राणे, वसुधा माने, प्रतिभा कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिभा कोतवाल म्हणाल्या, रानभाज्या पाककला स्पर्धेचे हे नववे वर्ष असून विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये रानभाज्यांबद्दल जनजागृती करणे व विद्यार्थ्यांना रानभाज्याचा आहारात समावेश करण्यासाठी प्रवृत्त करणे हा या स्पधेर्चा प्रमुख हेतू आहे. अर्पिता मुंबरकर म्हणाल्या, निरोगी जीवनासाठी रानभाज्या या अत्यंत उपयुक्त आहेत. सर्वांनी यांचा आहारात समावेश करावा . फास्ट फूड खाणे टाळा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
इयत्ता दुसरी : द्वितीय-रुही बाईत, इयत्ता तिसरी द्वितीय-आस्या बागवान, इयत्ता चौथी द्वितीय चिन्मय चव्हाण, इयत्ता पाचवी द्वितीय-दूर्वा मेजारी, इयत्ता सहावी द्वितीय- गिरीजा गुरव, इयत्ता सातवी द्वितीय-हर्षिका राणे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश चव्हाण, उपाध्यक्ष सायली राणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापिका अक्षया राणे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!