26.2 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

रेल्वे प्रवासात चोरी करणे भोवले | न्यायालयाने सुनावली शिक्षा

कणकवली – रेल्वे प्रवाशाचे पैसे चोरणारा संशयित आरोपी नितीश शेट्टी (४९, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. अंबरनाथ) याला कणकवली न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

मुंबईहून मेंगलोर एक्सप्रेसने कणकवलीच्या प्रवास करणारे कुंभवडे येथील शंकर रामचंद्र तावडे (सध्या रा. डोंबिवली) यांच्या बॅकेतील पॅकिटमधून साडेपाच हजारांची रोख रक्कम चोरणाऱ्या नितेश शेट्टी (३१, सध्या रा. अंबरनाथ) याच्यावर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली असून पुढील कारवाईसाठी शुक्रवारी ४ जुलै रोजी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्याला शनिवारी येथील न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी नितीश शेट्टी याच्याकडून रोकड व एका आयफोनसह चार मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याचा आणखी काही चोऱ्यांमध्ये सहभाग असल्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलीस तपास करीत होते. चोरीप्रकरणचा तपास करताना संशयित नितीश शेट्टी याने चोरीची कबुली दिली होती. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर नितीश शेट्टी याला पोलिसांनी कोर्टात हजर केले असता ५ हजार रुपयांचे दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद ही शिक्षा सुनावली आहे. चोरीप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत झोरे व पोलीस कॉस्टेबल स्वप्नील कदम यांनी करून या प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावला. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!