उपक्रमाचे उत्साहात उद्घाटन ; तालुक्यातील रुग्ण व नातेवाईकांना होणार फायदा
देवगड : येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी “रोटरी पेशंट बँक” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा फायदा तालुक्यातील रुग्णांना होणार आहे. कै. संजय धुरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या या पेशंट बँकेचे उद्घाटन रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अरुण भंडारे यांच्या हस्ते तर माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संग्राम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. हा उपक्रम गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी आर्थिक साहाय्य पुरवणार असून रोटरीच्या सेवाभावी कार्याला यामुळे आणखी एक नवा आयाम मिळाला आहे. यावेळी असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगडचे अध्यक्ष . गौरव पारकर, सचिव अनुश्री पारकर, मनस्वी घारे-हनिफ, श्रीपाद पारकर, खजिनदार दयानंद पाटील तसेच विजय बांदिवडेकर, अनिल कोरगावकर, अनिकेत बांदिवडेकर, प्रवीण पोकळे, रमाकांत आचरेकर, नरेश डामरी, श्यामल पोकळे, मनीषा डामरी, एकनाथ तेली आणि अनिल गांधी यांच्यासह अनेक रोटेरियन उपस्थित होते. या रोटरी पेशंट बँकेमुळे देवगड परिसरातील अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगडच्या सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण आहे.