कणकवली : कणकवली तालुका व्यापारी संघ व शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १२ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ यावेळेत कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसील हॉल येथे एआय ऑनलाईन वेबिनार आयोजित केला आहे. यात आयआयटी (आयएसएम) धनबाद येथील सीनिअर प्रोडयूसर मॅनेजर विनय सामंत हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी जीवन यावर होणारा परिणाम या विषयावर ऑनलाईन वेब सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. या वेबिनारचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक 777693144 सातोसे सर,94216 44080 राजा राज्याध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा.