कणकवली : तालुक्यातील लोरे नं १ ग्रामपंचायतची उपसरपंच निवडीची विशेष सभा सरपंच अजय तुळशीदास राव राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली. यामध्ये उपसरपंच पदासाठी रसिका रविंद्र राणे यांचा एकमेव नामनिर्देशनपत्र प्राप्त असल्याने त्यांची विशेष ग्रामपंचायत सभेत लोरे नं.१ उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या सभेला माजी पं. स. कणकवलीचे सभापती मनोज रावराणे, सुमन गुरव, नरेश गुरव, सतिश कासले, जयदास तेली, सुप्रिया रावराणे, समिक्षा मोसमकर, सोनाक्षी खाड्ये ग्रा. पं. सदस्य, राकेश गोवळकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रा.पं.लोरे नं.१, सुनिल रावराणे, काशिराम नवले, अनंत रावराणे, गणपतराव शिंदे लोरे तलाठी आदी उपस्थित होते.