महामार्गालगत असलेले बॅरिकेट्स देखील तुटले ; कोणतीही जीवितहानी नाही
रविवारी पहाटेच्या सुमारास झाला अपघात
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्सनजीक रविवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ( एमएच ०९ सीयू ३००८ ) ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर चढल. साधारणपणे १०० मीटर पर्यंत सदरचा ट्रक बॅरिकेट्स तोडत पुढे जाऊन थांबला. बॅरिकेट्सचे अक्षरशः चक्काचूर होऊन तुटून गेली. सुदैवाने चालकाला दुखापत झाली नसली तरी पहाटेच्या सुमारास झोपेत असताना ट्रक चालकाकडून हा अपघात झाल्याचे समजते. यामुळे महामार्गावर अक्षरशः चिखलाचे देखील झाला होता. दरम्यान या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली.